Edition

जागतिक वृद्धपचार दिनानिमित्त डॉक्टरांसाठी विविध विषयांवर व्याख्यानांचे आयोजन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर : प्रतिनिधी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, औषधशास्त्र विभाग आणि जेरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडिया, कोल्हापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वृद्धपचार दिनानिमित्त वृद्धांच्या आरोग्यविषयक समस्यांवर मार्गदर्शन करणाऱ्या विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.
दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या वेळेत रुग्णालयातील डॉक्टर व आंतरवासिता (इंटर्न) यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वृद्धावस्थेत उद्भवणाऱ्या विविध आजारांचे निदान, उपचार, प्रतिबंधात्मक उपाय तसेच वृद्ध रुग्णांच्या सर्वांगीण आरोग्य व्यवस्थापनाबाबत या व्याख्यानातून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी डॉ. दीपक जोशी यांनी ‘ऑस्टिओपोरोसिस इन एल्डरली’, डॉ. अनिता बसवराज, विभागप्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग यांनी ‘बेसिक्स ऑफ जेरियाट्रिक मॅनेजमेंट’, तर डॉ. अनिता परितेकर, सहयोगी प्राध्यापक यांनी ‘व्हॅक्सिनेशन इन जेरियाट्रिक प्रॅक्टिस’ या विषयांवर मार्गदर्शन केले.
तसेच डॉ. पी. ए. चौगुले यांनी ‘अल्झायमर्स डिसीज अँड बिहेवियर डिसऑर्डर’, डॉ. वरुण बाफना यांनी ‘हिमॅटोलॉजी अँड ऑन्कोलॉजी’, डॉ. अक्षय शिवचंद यांनी ‘बेसिक्स ऑफ जेरियाट्रिक ऑन्कोलॉजी’, तर डॉ. विद्या पाटील यांनी ‘अॅक्युट किडनी इंज्युरी इन जेरियाट्रिक पॉप्युलेशन’ या विषयांवर सविस्तर व्याख्याने दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, कोल्हापूर जिल्हा जेरियाट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मिठारी तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र मदने, डॉ. आरती घोरपडे यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, आंतरवासिता व इतर मान्यवर उपस्थित होते.
वृद्धांच्या वाढत्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन डॉक्टरांनी जेरियाट्रिक मेडिसिनमधील विविध पैलूंचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!