Edition

पत्रकार उत्तम जगताप यांना मातृशोक; मार्याबाई जगताप यांचे निधन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

यड्राव : प्रतिनिधी — येथील पत्रकार उत्तम जगताप यांच्या मातोश्री मार्याबाई दगडू जगताप (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने जगताप कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, यड्राव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मार्याबाई जगताप या प्रेमळ, मनमिळावू आणि आपुलकीच्या स्वभावाच्या होत्या. साधेपणा आणि जिव्हाळ्याच्या वागणुकीतून त्यांनी गावातील तसेच समाजातील अनेकांशी आपुलकीचे संबंध निर्माण केले होते. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे त्या सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून राहिल्या होत्या.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जगताप कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यांच्या निधनाने यड्राव परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे, नातसुना, परतवंडे असा मोठा परिवार आहे.
दरम्यान, मार्याबाई जगताप यांना श्रद्धांजली वाहण्याचा (फुले वाहण्याचा) कार्यक्रम सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!