Edition

कांडी मशीनमध्ये ओढणी अडकून महिला कामगाराचा मृत्यू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

खोतवाडी : येथील अयोध्यानगर परिसरातील श्रीभु फॅब्रिक्स कंपनीत मशीनमध्ये ओढणी अडकून गळफास लागल्याने ३६ वर्षीय महिला कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (२ ऑक्टोबर) सकाळी घडली. आक्कुबाई महादेव पोवार (वय ३६, रा. गीताई प्ले स्कूलच्या मागे, खोतवाडी, ता. हातकणंगले) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आक्कुबाई पोवार या श्रीभु फॅब्रिक्स येथे मशीनमध्ये कांडी भरण्याचे काम करीत होत्या. सकाळी सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ड्रेसची ओढणी मशीनमध्ये अडकली. त्यामुळे ओढणीचा त्यांच्या गळ्याला फास बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत संतोष रच्चप्पा बेळगी यांनी शहापूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासासाठी सफौ मोहिते व पोलीस कॉन्स्टेबल तेलंग यांना रवाना केले आहे. या प्रकरणाची चौकशी पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड करीत आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!