Edition

नवरात्री उत्सवापर्यंत तरी गरुड मंडप पूर्ण होईल का? पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या रटाळ व ढिसाळ कारभारा बाबत कोल्हापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सचिवांना निवेदन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अत्यंत मोठा गाजावाजा करत कोट्यावधी रुपयाची घोषणा करत तुटपुंजा रकमेवर बोळवण करत आज महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडाचा गवगवा करत शासनाने त्याचं काम सुरू केलं. अनेक वादग्रस्त प्रकरणे त्यात जुन्या मूर्तींची पुनर्स्थापना,तसेच जुने दगड घासणे काढणे,त्याला दिलेली व्हायब्रेशन्स अशा गोष्टीमुळे अनेक ठिकाणी,टीकेला तसेच अनेकांच्या रोषाला कारणीभूत ठरलेले अंबाबाईचे भक्त अनेक अडीअडचणींना तोंड देत दर्शन घेता आहेत. गरूड मंडप कोल्हापूरच्या वैभवशाली परंपरेचा साक्षीदार आहे.पण निव्वळ तांत्रिकदृष्ट्या सक्षमता नसल्यामुळे अनेक वेळेला गरुड मंडपाचं झालेलं काम उतरावं लागलं. या आपल्या देशामध्ये खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून प्रसिद्ध असणारा किरणोत्सव या गरुड मंडपातूनच होतो. लक्षावधी खगोलप्रेमींना तसेच भाविकांना पर्वणी असणारा हा किरणोत्सव म्हणजे एक शास्त्रीय परंपरेचा अद्वितीय नमुना आहे. दरवर्षी गरुड मंडपात पुनस्थापित होणारा गणपती तर गेली कित्येक वर्ष बाहेरच आहे.
मात्र “जगतजननी अंबाबाई ” जे भारतातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान आणि आमच्या कोल्हापूरचे वैभव आहे त्या महालक्ष्मीची मूर्ती सुद्धा,या गरुड मंडपाच्या अपूर्ण कामकाजामुळं नवरात्री मध्ये गरुड मंडपात सुस्थापित होत नाही. हे दुर्दैव आहे.
या निवेदनाद्वारे आम्ही देवस्थान समितीला सुचित करू इच्छितो की,
देव, देश,आणि धर्म याबाबतीत कुठलेही राजकारण न आणणे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची परंपरा व ठाकरे घराण्याची संस्कृती आहे. मा शिवसेनाप्रमुख कै हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं करवीर निवासिनी अंबाबाई हे तर आराध्य दैवत होतं. पक्षप्रमुख उद्धवजी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची ही पुज्यभूमी व अंबाबाईची पुण्यभूमी म्हणून कोल्हापूरला नतमस्तक होत असतात.
या नवरात्रमध्ये जर गरुड मंडपामध्ये काम पूर्ण होऊन अंबाबाईची पालखी अथवा अंबाबाई ची मूर्ती ठेवण्याची व्यवस्था जर शासन करू शकत नसेल तर मात्र कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जनआंदोलन उभारावा लागेल. शासनाच्या निवळ वेळकाढू धोरणामुळे व कंत्राटदाराच्या चुकीच्या भूमिकांच्या मुळे जर आमच्या देव-देवतांच्या बाबतीत शासनाच्या आडमुठी पणाच्या भूमिकेमुळ अडचण होत असेल तर,आम्हाला या गरूड मंडपाच्या रेंगाळलेल्या कामाबद्दल
जण -आंदोलन करावं लागेल. याची नोंद घ्यावी..
या मागणीचे निवेदन आज देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे यांना देण्यात आले, हे निवेदन शिवसेना शहरप्रमुख युवा सेना जिल्हाप्रमुख मंजित माने यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले, यावेळी उपस्थित जिल्हा प्रमुख विराज पाटिल, शहर प्रमुख मंजित माने, उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे,शुभांगी साळोखे, रणजित आयरेकर, चंद्रकांत भोसले, पपू नाईक, महादेव कोकडे,संजय जाधव,दीपाली शिंदे, सानिका दामूगडे, अक्षय घाटगे, शौनक भिडे,नंदू पोवार, ऋषिकेश जोशी,सुनिल जोशी, अभिशेक दाबाडे, आदी

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

traffic tail

error: Content is protected !!