Edition

‘उचगाव स्मशानभूमीत आणि ग्रामपंचायत चौकात बैठकीसाठी लोखंडी बाकड्यांची सोय; नामदेव वाईंगडे यांचा स्तुत्य उपक्रम.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:प्रतिनिधी – उदय साळुंखे,उचगावः करवीर तालुक्यातील उचगाव येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या
नागरिकांना बसण्यासाठी अपुरी सुविधा असल्याने गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य नामदेव वाईंगडे यांच्या पुढाकारातून स्मशानभूमीत नागरिकांच्या बैठकीसाठी लोखंडी बाकड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. याचबरोबर उचगाव ग्रामपंचायत चौकात ज्येष्ठ नागरिकांसाठीही बाकड्यांची व्यवस्था यावेळी करण्यात आली आहे. या लोखंडी बाकड्यांचे उद्घाटन उचगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण, जि.प.सदस्य नामदेव वाईगडे व ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात

आले. यावेळी बोलताना सरपंच मधुकर चव्हाण यांनी उचगाव स्मशानभूमीत अत्याधुनिक सुविधा ग्रामपंचायतीने
पुरविल्या असून येथे मोफत अंत्यसंस्कार, मोफत रुग्णवाहिका उपलब्ध आहे बसण्यासाठी लोखंडी बाकाची आवश्यकता होती ती जिल्हा परिषद सदस्य नामदेव वाईंगडे यांनी पूर्ण केली आहे.

जि. प. सदस्य नामदेव वाईंगडे म्हणाले की, मराठी शाळेचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना व उचगाव स्मशानभूमीसाठी नागरिकांच्या बैठकीसाठी चांगले व मजबूत लोखंडी बाकडे देण्यात आली आहेत. येथून पुढेही उचगाव जि.प. मतदार संघाच्या विकासासाठी

भरघोस निधी देणार आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य नामदेव वाईंगडे, पंचायत समिती सदस्य तानाजी कांबळे, सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच अरविंद शिंदे, सरनोबतवाडी सदस्य दीपक अडसूळ, उमेश देशमुख, अनिल दळवी, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चव्हाण, पांडुरंग घुणके, दीपक रेडेकर, ‘निवास यमगर, विनोद थोरात, विजय गुळवे, अनिल अवघडे, उमेश पाटील, निवास यादव, शैलेश पवार, श्रीधर कदम, महालिंग जंगम, विजय यादव, बाजीराव पोवार, संदीप वळकुंजे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!