Edition

चंदगड तालुक्यात १० लाखांचा मद्यसाठा जप्त; स्विफ्ट डिझायर कारसह आरोपीला बेड्या

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर,(प्रतिनिधी)
उदय साळुंखे

दि. २४
गोवा राज्यातून बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणला जाणारा विदेशी दारूचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्काच्या शिनोळी सीमा तपासणी नाक्यावरील पथकाने जप्त केला आहे. चंदगड तालुक्यातील पार्ले गावच्या हद्दीत तिलारी-मोठणवाडी रस्त्यावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली असून, वाहनासह एकूण १० लाख ३ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाने २४ सप्टेंबर रोजी ही धडक कारवाई केली. संशयित सोनेरी रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारची (MH 02 DG 9304) तपासणी केली असता, त्यात विविध ब्रँड्सच्या गोवा बनावट विदेशी मद्याचे ४३ बॉक्स आढळून आले. यात ३ लाख ५३ हजार ८८० रुपयांची दारू आणि ६ लाख ५० हजार रुपये किमतीची कार, असा एकूण १० लाख ३ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कार चालक आरोपी मुसा अब्दुलराजाक जमादार (वय – , रा. कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रमोद खरात, दुय्यम निरीक्षक डी. एम. वायदंडे, आर. सी. केरीपाळे, जी. एल. राणे तसेच जवान भरत सावंत, राहुल शिंदे, किरण बागुल, ऋषिकेश इंगळे, संदीप चौगुले, तुषार पवार, अविनाश परीट आणि महिला जवान स्वप्नाली बेडगे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक डी. एम. वायदंडे करत आहेत.
जप्त मुद्देमालाचा तपशील:
* गोवा बनावट विदेशी दारू (४३ बॉक्स): ₹ ३,५३,८८०/-
* स्विफ्ट डिझायर कार (MH 02 DG 9304): ₹ ६,५०,०००/-
* एकूण जप्त मुद्देमाल: ₹ १०,०३,८८०/-

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!