Edition

वारणा पट्ट्यात पावसाची हजेरी वारणा पट्ट्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; सुकलेल्या पिकांना जीवदान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याच्या वारणा पट्ट्यात आज बुधवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. कुरळप, करंजवडे, लाडेगाव, वशी, ऐतवडे बुद्रुक, येलूर, कुंदलवाडी, तांदळवाडी आणि ऐतवडे खुर्द परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.
गेल्या २५ ते ३० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने माळरानावरील खरीप पिके सुकू लागली होती. पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचे मोठे संकट निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत आज झालेल्या पावसामुळे सुकत चाललेल्या पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले आहे.
पावसामुळे परिसरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा मिळाला. पावसाचा जोर आणखी वाढल्यास खरीप पिकांना मोठा फायदा होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!