Edition

राजारामबापू पाटील विविध विकास सेवा सोसायटीची वार्षिक सभा गोंधळात सर्व विषय मंजूर करत सभा आटोपली; सभेनंतर शिवीगाळीच्या तक्रारीने राजकीय वातावरण तापले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कुरळप, ता. वाळवा : येथील राजारामबापू पाटील विविध विकास सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रचंड गदारोळ, शाब्दिक चकमक आणि सत्ताधारी-विरोधकांमधील वादावादीत पार पडली. विरोधकांनी विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळातच सत्ताधारी गटाने सर्व विषय मंजूर झाल्याचे जाहीर करून सभा आटोपती घेतली. दरम्यान, सभा संपल्यानंतर राजारामबापू दूध संघाचे संचालक व माजी सरपंच विलास पाटील यांना शिवीगाळ झाल्याचा आरोप करत कुरळप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
विठाई माऊली मंदिरात झालेल्या सभेची सुरुवात दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. सभा सुरू होताच सेक्रेटरी केरबा मिसाळकर यांच्या पुनर्नियुक्तीचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. मिसाळकर सेवानिवृत्त झाले असताना त्यांची पुनर्नियुक्ती कशी झाली, असा सवाल करण्यात आला. यावर चेअरमन रघुनाथ सुतार यांनी, “ही नियुक्ती संस्थेने केलेली नसून ए.आर. कार्यालयाकडून त्यांना एक वर्षाचे नियुक्तीपत्र मिळाले आहे,” असे स्पष्टीकरण दिले.
यानंतर सेक्रेटरी मिसाळकर प्रोसीडिंग वाचत असताना विरोधकांनी त्याला आक्षेप घेत, प्रोसीडिंग चेअरमन यांनी वाचून दाखवावे, अशी मागणी केली. संस्थेचे कामकाज व प्रोसीडिंग सेक्रेटरींकडून वाचून दाखवण्याची पद्धत असल्याचे सत्ताधारी गटाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, उत्तम वायदंडे यांनी संस्थेच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. त्यावेळी माजी चेअरमन संपत देवकर यांनी वायदंडे हे संस्थेचे सभासद नसल्याने त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. यावरून दोन्ही गटांत जोरदार शाब्दिक चकमक झाली आणि सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
गोंधळ वाढत असताना सत्ताधारी गटाने सभेतील सर्व विषय मंजूर झाल्याचे जाहीर करून सभा संपवली. पदाधिकारी व कर्मचारी सभास्थळातून बाहेर पडल्यानंतर विरोधी गटाने सत्ताधाऱ्यांवर टीका केली. सभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देता न आल्यानेच सभा घाईने संपवण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला.
दरम्यान, सभा संपल्यानंतर राजारामबापू दूध संघाचे संचालक व माजी सरपंच विलास पाटील यांना शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला. विरोधी गटातील सूरज सुखदेव देवकर यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करत विलास पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुरळप पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकारामुळे कुरळपच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

*चौकट* :
सभा उधळून लावणे हेच विरोधकांचे काम!
– विलास निवृत्ती पाटील
“सभा सुरळीत पार पडू न देणे हेच काम विरोधक कायम करत आले आहेत. सभासदांच्या दृष्टीने काय महत्त्वाचे आहे, याकडे ते लक्ष देत नाहीत. दरवर्षी सभेत वादावादी करून सभा बंद पाडण्याचा प्रयत्न केला जातो. सभेतील सर्व विषय सर्वसामान्य सभासदांना समजणे आवश्यक असताना त्याआधीच वाद निर्माण करून सभा उधळून लावण्याचे काम विरोधक करत आहेत,” असा आरोप विलास पाटील यांनी केला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!