Edition

संत कबीर, नारायण सुर्वे हे लोकविद्यापीठ – डॉ. विश्वाधार देशमुख.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलूत गणेशोत्सव व्याख्यानमालेत ‘आधुनिक साहित्यातील कबीर : कवी नारायण सुर्वे’ विषयावर व्याख्यान.

सेलू : दि.22 रोजी संत कबीर आणि कवी नारायण सुर्वे यांनी शेवटच्या सर्वसामान्य माणसापर्यंत आपला आवाज पोहोचविला. प्रबोधन, परिवर्तन आणि व्यवस्था बदलाचे ते दीपस्तंभ होते. चेहराविहीन माणसाला चेहरा देणारे हे दोन्ही कवी जनमानसावर अमिट प्रभाव पाडणारे लोकविद्यापीठ होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते प्रा. डॉ. विश्‍वाधार देशमुख यांनी केले.नूतन विद्यालयाच्या कै. रा. ब. गिल्डा सभागृहात सोमवारी गणेशोत्सव व्याख्यानमालेचे पहिले पुष्प श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले. वैचारिक जागर मांडणार्‍या या व्याख्यानमालेचे यंदा 65 वे वर्ष असून पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘आधुनिक साहित्यातील कबीर : कवी नारायण सुर्वे’ या विषयावर डॉ. देशमुख यांनी व्याख्यान दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. राजाराम झोडगे होते.डॉ. देशमुख म्हणाले, संत कबीर आणि नारायण सुर्वे यांनी जग, जीवन आणि माणसांवर प्रेम करायला शिकवले. त्यांच्या कवितेत करुणा होती. नारायण सुर्वे यांनी सर्वसामान्य माणसाला साहित्यविश्वात ओळख मिळवून देत त्याला कवितेचा नायक केले. दोन्ही कवींनी समूहाच्या मुक्तीची भूमिका मांडत समाजाच्या तळाशी असलेल्या माणसांशी संवाद साधला आणि लोकशहाणपणाची शिकवण दिली. निराशाजनक वातावरणातही त्यांच्या साहित्याने आशावाद जागविला. संत कबीर आणि नारायण सुर्वे हे देशाची परंपरा सांगणारे कवी होते, असेही त्यांनी नमूद केले.अध्यक्षीय समारोपात डॉ. राजाराम झोडगे यांनी नारायण सुर्वे यांच्या निवडक कवितांचे वाचन केले. संत कबीर आणि नारायण सुर्वे हे उपेक्षित माणसांच्या वेदना व दुःख जाणणारे कवी होते, असे त्यांनी सांगितले. भगवान देवकते यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन कवी डॉ. अशोक पाठक यांनी केले, तर मोहन खापरखुंटीकर यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक किरण देशपांडे, अजित मंडलिक, डॉ. विलास मोरे, डॉ. सुरेश हिवाळे, डॉ. काशिनाथ पल्लेवाड, डॉ. शरद ठाकर व बाळू बुधवंत यांनी कार्यक्रमाच्या यशस्विते साठी पुढाकार घेतला. कार्यक्रमास बाबासाहेब चारठाणकर, प्रा. ए. टी. देशमुख, नागेश देशपांडे व दत्तात्रय माकोडे यांच्यासह साहित्यप्रेमींची उपस्थिती होती.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!