Edition

सहकार भारती कोल्हापूर विभागाच्या वतीने मा. डॉ. आण्णासाहेब डांगे यांचा सत्कार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आष्टा, ता. वाळवा येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या मा. अण्णासाहेब डांगे शैक्षणीक संकुलातील सभागृहात सहकार भारती ची कोल्हापूर विभाग (सांगली, सातारा, कोल्हापूर) विभागातील महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष, तिन्ही जिल्ह्यातील प्रदेश, तालुका व जिल्हा पदाधिकारी यांची महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख मा. श्री. संजयजी परमणे यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा. डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी नियोजना संदर्भात व्यापक बैठक संपन्न झाली.

या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री, राज्याचे नेते मा. डॉ. अण्णासाहेब डांगे यांचा सत्कार सहकार भारती पतसंस्था प्रकोष्ठ चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. सागरजी चौगुले व सांगली जिल्हाध्यक्ष श्री. सुमंतजी महाजन यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार, फेटा व पुस्तक देवून करण्यात आला. यावेळी बोलताना मा. अण्णासाहेब डांगे म्हणाले कि, सहकार भारतीच्या माध्यमातुन राज्यामध्ये समाजकारणा बरोबरच सहकार क्षेत्रात निरनिराळ्या व्यवस्थेत काम करणारे कार्यकर्ते तयार होणे आवश्यक आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातुन सहकार वृध्दीगत होणेसाठी सतत प्रयत्नशिल असणे आवश्यक आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख श्री. संजयजी परमणे, महाराष्ट्र प्रदेश सह संघटन प्रमुख प्रविण बुलाख, विभाग संघटन प्रमुख जवाहर छाबडा, सांगली जिल्हाध्यक्ष श्री. सुमंतजी महाजन, संघटन प्रमुख श्री. चंद्रकांत धुळप, सातारा जिल्हाध्यक्ष श्री. डॉ. रविंद्र भोसले, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शरदचंद्र दिवाण, महामंत्री श्रीकांत चौगुले, कोल्हापूर जिल्हा महिलाध्यक्षा सौ. सुषमा पाटील, सांगली जिल्हा महिलाध्यक्षा सौ. सारिखा मुळे, सातारा जिल्हा महिलाध्यक्षा शर्मिली श्रीखंडे यांच्यासह सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार भारतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत प्रास्तावीक वाळवा तालुका संघटन प्रमुख श्री. बजरंग कदम यांनी केले. आभार तालुकाध्यक्ष पांडूरंग वाघमोडे यांनी मानले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail
error: Content is protected !!