Edition

चिक्कोडी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा नणदी येथे संपन्न; नागरमनोळी, वाळकी, कब्बूरच्या संघांची बाजी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी क्लस्टरमधील १३ शाळा व हायस्कूलमधील १४ ते १७ वयोगटातील मुला-मुलींच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा नणदी येथील प्राथमिक कन्नड शाळा व हायस्कूलच्या मैदानावर आज दिनांक १७ रोजी मोठ्या उत्साहात पार पडल्या.

स्पर्धा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. ए. आय. कोठीवाले हे होते. श्री हालसिद्धनाथ मंदिराचे पुजारी श्री. सिदबिर पुजारी व नणदीचे माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

या स्पर्धांमध्ये अंकली, येडूर, चिक्कोडी, नागरमनोळी, हिरेकोडी, एकसंबा, सदलगा, कोथळी, खडकलाट, पट्टणकुडी, वाळकी, केरूर, मजलट्टी, कब्बूर, नणदी इत्यादी शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता
हायस्कूल विभाग –
*मुले –* प्रथम क्रमांक – नागरमनोळी हायस्कूल, द्वितीय क्रमांक – एकसंबा हायस्कूल
*मुली –* प्रथम क्रमांक – वाळकी हायस्कूल, द्वितीय क्रमांक – केरूर हायस्कूल
*प्राथमिक विभाग –*
*मुले –* प्रथम क्रमांक – नागरमनोळी प्राथमिक शाळा, द्वितीय क्रमांक – कब्बूर प्राथमिक शाळा
*मुली –* प्रथम क्रमांक – कब्बूर प्राथमिक शाळा, द्वितीय क्रमांक – सदलगा प्राथमिक शाळा

यावेळी मल्लू हवालदार, सिदबिर पुजारी, पद्मना पुजारी, सुरेश मस्ते, ए. डी. मजलट्टी, आर. बी. चौगुले, महेश कट्टीमनी, एल. व्ही. चौगुले, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका हुल्लुळे मॅडम, एम. के. खोत इत्यादी मान्यवरांसह सर्व शाळांचे पी. ई. शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!