Edition

वंचितांच्या हक्कासाठी रिपब्लिकन सेना मैदानात; करवीर तालुका आरे गावात परिसंवाद मेळाव्यात संघटन वाढीवर भर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर/प्रतिनिधी – उदय साळुंखे

आरे (करवीर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, माता रमाई व डॉ. आंबेडकर यांनी केलेला त्याग व संघर्ष कधीही विसरता कामा नये. रिपब्लिकन सेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करून आगामी काळात सामाजिक न्याय, संविधान संरक्षण आणि वंचितांच्या हक्कासाठी आक्रमकपणे काम करावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष दयानंद शिवजातक यांनी केले.

रिपब्लिकन सेनेच्या करवीर तालुक्यातील आरे गावात झालेल्या परिसंवाद मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी महिला आघाडी अध्यक्षा रसिका चौगुले म्हणाल्या, “डॉ. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलातून महिलांना हक्क दिला, सावित्रीबाईंनी शाळा काढली. आता आम्ही प्रत्येक गावात ५ महिला जोडून त्या विचाराला ताकद देऊ.”

“शाहू महाराजांनी सांगितलं – समाजाचा विकास करायचा असेल तर आधी समाजातला शेवटचा माणूस मोठा झाला पाहिजे. रिपब्लिकन सेना हा महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपणारा पक्ष आहे,” असे मत करवीर अध्यक्ष भिमराव गोंधळी यांनी व्यक्त केले. यावेळी शंकर माने यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर ढाले यांनी केले तर आभार प्रदर्शन करवीर महासचिव अर्जुन कांबळे यांनी केले.

“करवीरची भूमी आहे, इथूनच समतेचा लढा उभा करू,” असा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवर:
जिल्हा महासचिव सागर कुरडे, शहर अध्यक्ष प्रवीण आजरेकर, रवि कांबळे, शिवाजी कांबळे, हिंदुराव सोरटे, मधुकर सोरटे, दिलीप कांबळे, कबीर सोरटे, विनोद कांबळे, हौसाबाई कुबडे, शोभा ढाले, गंगुबाई कुबडे, रंजना ढाले, आशा ढाले, आकांक्षा ढाले, गीता सोरटे, शाहूबाई कुबडे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!