Edition

सेलू-जिंतूर मध्ये 99% कुणबी प्रमाणपत्र वाटप; SIR मध्ये तिसरा क्रमांक.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू-जिंतूरमध्ये 4269 पैकी 4253 कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; 99.63% टक्के काम पूर्ण.

सेलू : सेलू-जिंतूर उपविभागात कुणबी जात प्रमाणपत्रांच्या प्रलंबित अर्जांचा प्रशासनाने वेगाने निपटारा केला असून, प्राप्त 4269 अर्जांपैकी तब्बल 4253 पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे प्रमाणपत्र वितरणाचे काम 99.63% टक्क्यांवर पोहोचले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिली.
सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. 11 सप्टेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सेलूचे तहसीलदार डॉ. शिवाजी मगर उपस्थित होते.
न्यायमूर्ती शिंदे समितीच्या सर्वेक्षणादरम्यान जुन्या अभिलेखांची तपासणी करण्यात आली. या प्रक्रियेत सेलू तालुक्यात 424, तर जिंतूर तालुक्यात 692 ऐतिहासिक नोंदी आढळून आल्याची माहिती देण्यात आली. या नोंदींच्या आधारे सेलू-जिंतूर उपविभागातून एकूण 4269 नागरिकांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले होते. त्यापैकी 4253 अर्जदारांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले असून, उर्वरित अर्जांची प्रक्रिया सुरू असल्याचे लाहोटी यांनी सांगितले.
SEBC प्रमाणपत्रांचेही मोठ्या प्रमाणात वितरण.
उपविभागात SEBC मराठा जात प्रमाणपत्रांचेही मोठ्या प्रमाणात वितरण करण्यात आले आहे. सन 2024 मध्ये 2946, सन 2025 मध्ये 3992 , तर सन 2026 मध्ये 2424 , अशी एकूण 9362 SEBC प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कुणबी व SEBC प्रमाणपत्रे मिळून जवळपास 14 हजार प्रमाणपत्रांचे वितरण सेलू-जिंतूर उपविभागात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात जिंतूर-सेलू उपविभाग तिसऱ्या क्रमांकावर.
SIR प्रक्रियेबाबत माहिती देताना लाहोटी यांनी सांगितले की, मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षणाच्या कामात जिंतूर-सेलू उपविभागाने राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. परभणी जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असून, जिल्ह्यातील गंगाखेड उपविभाग पहिल्या तर जिंतूर-सेलू उपविभाग तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले.
या कामात BLO, सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच पत्रकारांचे सहकार्य लाभल्याचे नमूद करत उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी सर्वांचे विशेष आभार मानले.
10 ते 17 सप्टेंबर दरम्यान कुणबी-मराठा विशेष शिबिरे
कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा पात्र नागरिकांसाठी दि. 10 ते 17 सप्टेंबरदरम्यान मंडळनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या गावासाठी निश्चित केलेल्या तारखेनुसार संबंधित शिबिराच्या ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून जात प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लाहोटी यांनी केले.
नवीन मतदार नोंदणीसाठी प्रत्येक बुथवर शिबिरे.
नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी 19, 20, 26 व 27 सप्टेंबर या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली. पात्र नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!