Edition

खोतवाडी हायस्कूल,खोतवाडी येथे प्रथमाचार्य श्री.108 शांतीसागर महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी,ता.हातकणंगले,
जि.कोल्हापूर येथे प्रथमाचार्य श्री.108 शांतीसागर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने व प्रथमाचार्य श्री.108 शांतीसागर महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने झाली.
संस्थेचे सचिव श्री.सागर चुडाप्पा सर व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.यासीन मुजावर सर तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.शांतीनाथ मगदुम सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पुजन संपन्न झाले.
यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.शांतीनाथ मगदुम सर यांनी शांतीसागर महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती आपल्या मनोगतातुन सांगितली.
तसेच अध्यक्षीय मनोगतातून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.यासीन मुजावर सर यांनी शांतीसागर महाराज यांच्या सामाजिक कार्याविषयी त्यांच्या जीवनाविषयी माहिती दिली.
शांतीसागर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यालयामध्ये संस्थेचे सचिव श्री.सागर चुडाप्पा सर व मुख्याध्यापक श्री.यासीन मुजावर सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी,शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. समाजे सी.बी.यांनी केले तर आभार सौ.धारवट एम.एम.यांनी मानले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!