गांधीनगर/प्रतिनिधी-उदय साळुंखे ता. करवीर गांधीनगर वसाहत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप वाडकर यांची झालेली बदली रद्द करावी आणि त्यांना पुन्हा वसाहत रुग्णालयामध्ये त्याच पदावर नेमणूक द्यावी अशी मागणी गांधीनगर वळीवडे, चिंचवाड, येथील ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आ. अमल महाडिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली
निवेदनात म्हटले आहे की गेली दोन वर्षापासून डॉ. वाडकर यांनी गांधीनगर वसाहत रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक म्हणून रुजू झाले. तेव्हापासून या
रुग्णालयाचा कायापालट करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. विविध शासकीय आरोग्य योजना तसेच सामान्य रुग्णांना रुग्णसेवा देऊन या रुग्णालयाचा नावलौकिक वाढवला आहे. रुग्णालयात लावलेली शिस्त,
तसेच रुग्णालयात विविध अमलात आणलेल्या सेवा यामुळे वसाहत रुग्णालयात बाह्य रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यांच्यावर वेळेत त आणि चांगले उपचार होत असून रुग्णांमध्ये आणि येथील पंचक्रोशीतील नागरिकात
समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे त्यांची इतरत्र झालेली बदली रद्द करून त्यांना पुन्हा गांधीनगर वसाहत रुग्णालयांमध्येच नियुक्ती द्यावी, अशी मागणी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्याकडे केली. यावेळी गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, प.स. सदस्य रवी मलानी, वळीवडेचे उपसरपंच भैय्या इंगवले, चिंचवाडचे सरपंच श्रद्धा पोतदार, सरपंच रितू लालवानी, ग्राप सदस्य महेश शेळके, महालक्ष्मी वुमन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता माने, पुनम परमानंदानी, विक्रम मोहिते, दलित महासंघाचे शहराध्यक्ष राजू कांबळे उपशहराध्यक्ष अनिल हेगडे, निलेश चव्हाण, कपिल घाटगे, सनी चंदवानी, दीपक जमनानी, उदय पाटील, ग्रामस्थ, आधी उपस्थित होते.











