Edition

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सेलू शाखेत 70 वा वर्धापन दिन व विमा सप्ताह उद्घाटन समारंभ.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी .

सेलू : सेलू येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सेलू शाखेत 70 व्या वर्धापन दिन व विमा सप्ताह उद्घाटन समारंभ साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संतोष कोडगिरकर ( वरिष्ठ शाखा प्रबंधक)होते. कार्यक्रमाचे उद्धाटन प्रमुख पाहुणे सभापती डॉ संजय रोडगे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. विमा सप्ताहच्या निमित्त सेलू शाखेच्या वतीने 01 ते 07 सप्टेंबर विमा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे सेलु येथील विकास अधिकारी उपेंद्र बेल्लुरकर तर्फे कॉर्पोरेट प्रतिज्ञा देण्यात आली. याप्रसंगी सेवानिवृत्त कर्मचारी व नुकतेच हज यात्रा करून आलेले शमशोदिन शेख यांचा प्रमुख पाहुणे संजय रोडगे यांचे हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर नामदेव मुंडे, उपेंद्र बेल्लुरकर यांचा हि सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष डिझाईन केलेले एल आय सी बॅज परिधान केले होते.या सप्ताहात मध्ये शाळेत पि ए भेट,निबंध स्पर्धा, वृक्षारोपण, रक्तदान शिबीराचे ४ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजन केले आहे. विकास अधिकारी व सी एल आय ए एजंट यांचा सत्कार करण्यात येणार आहे.कार्यक्रमात डॉ संजय रोडगे,संतोष कोडगिरकर, उपेंद्र बेल्लुरकर, संपत कपाळे,डॉ अनिल शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले सुत्र संचालन डॉ विद्यासागर बैनाडे, प्रास्तविक भास्कर हिप्परगे व आभार प्रदर्शन सचिन शिर्के यांनी केले. या वेळी प्रभाकर भांडवले, शिवाजी अघाव,जाकेर शेख,रामा धोतरे, मनोहर भानुसे,अक्षय जोशी,प्रियंका धवन मैडम,प्रदिप कानकाटे,शिशांत काळे,भालचंद्र बरडे,मन्मथ देवडे,वैदांत सासवडे,नामदेव मुंढे,राजकुमार नाईकवाडे, भारत डख,संजय मुंडे, शंभू काकडे, साहेबराव राठोड, श्रीकांत वाकडीकर,प्रकाश रोडगे, संजय मनियार,अशीश शहाणे, वसंत डख, कैलास गजमल, प्रल्हाद जाधव, बाबासाहेब जगदाळे,शंकर जिवने,संदिप जाधव,सुरेंद्र सराफ,अमीर शेख बबन झोल व कर्मचारी, विकास अधिकारी, अधिकारी, विमा प्रतिनिधी व विमा धारक आदि मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!