Edition

हुपरी नगरपरिषद स्वीकृत नगरसेवक पदी नेताजी निकम व वकिल राजेंद्र सुतार यांची एकमताने निवड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

हुपरी प्रतिनिधी ‌ – हुपरी नगरपरिषदेमध्ये सध्या भाजपा शिवसेना महायुतीची एक हाती सत्ता असून नगरपरिषदेत स्वीकुत नगरसेवक दिपक बेडगे व उदय पाटील या दोन स्विकृत नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने भाजपा नेते आमदार राहुल आवाडे यांनी दिल्या आदेशाने आज स्वीकृत नगरसेवक पदाची माळ पैलवान नेताजी निकम व ॲड.राजेद्रं सुतार यांच्या गळ्यात पडली व त्यांच्या नव्या निवडी आज विशेष सभेने करण्यात आल्या
यावेळी हुपरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे व सभा अध्यक्ष नगराध्यक्ष मंगलरावजी माळगे यानी नव्या निवडीची घोषणा केली यावेळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब रणदिवे,नगरसेवक गणेश वाईगडे,संतोष वाळवेकर, संदीप आपटे,स्वप्निल हुपरीकर,अमर माने,अमय जाधव,ऋतुजा गोंधळी,नम्रता कांबळे,भारती नायकवडी,
पदाधिकारी उपस्थित होते विरोधी व सत्ताधारी शिंदे सेनेच्या पक्षाच्या नगरसेविका सभेला गैरहजर राहिल्या अखेर नेताजी निकम व राजेंद्र सुतार यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण केली व जल्लोष साजरा करत गावांमधून मिरवणुकीने त्यांचे स्वागत केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!