Edition

नेपाळमध्ये भोटेकोशी नदीचा रौद्रावतार; क्षणात उद्ध्वस्त झाल्या वस्त्या, रस्ते आणि पूल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नेपाळ वृत्तसेवा – नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटेकोशी नदीला आलेल्या अचानक महापुराने मोठी हानी झाली. नदीच्या रौद्र प्रवाहाने नदीकाठच्या वस्त्या, बाजारपेठा, रस्ते आणि पूल अक्षरशः वाहून गेले. अनेक भागांचा संपर्क तुटल्याने बचावकार्य सुरू आहे.

स्याफ्रुबेसी, तिमुरे, बेत्रावती, मैलुंग आणि शांती बाजार परिसराला पुराचा मोठा फटका बसला. अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून काही इमारती आणि दुकाने उद्ध्वस्त झाली आहेत. रसुवागढीकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग अनेक ठिकाणी वाहून गेल्याने चीन सीमेकडील दळणवळण प्रभावित झाले आहे.

पूर ओसरल्यानंतर लष्कर, पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाने शोध व बचावमोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत किमान सात ते आठ मृतदेह आढळल्याची माहिती असून अनेक जण बेपत्ता आहेत. काही सुरक्षा कर्मचाऱ्यांशीही संपर्क होऊ शकलेला नाही.

नेपाळी लष्कराने तिमुरे, स्याफ्रु आणि नुवाकोट परिसरातून किमान २५ जणांची सुटका केली असून मदत व बचावासाठी १४ हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत.

दरम्यान, तिबेटच्या भागात बर्फाचा दरड कोसळून नदीचा प्रवाह अडला असावा आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी अचानक खाली आल्याने हा महापूर आला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुसळधार पावसाचाही या संकटाला हातभार लागल्याचे सांगण्यात येत आहे.

भोटेकोशीचे पाणी पुढे त्रिशूली नदीत मिसळत असल्याने नुवाकोट, धादिंगसह नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीकाठापासून दूर राहून सुरक्षित व उंच ठिकाणी आश्रय घ्यावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. वीज, दळणवळण आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने नुकसानग्रस्त भागात मदत पोहोचविणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरले आहे वृत्तसेवा : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटेकोशी नदीला आलेल्या अचानक महापुराने मोठी हानी झाली. नदीच्या रौद्र प्रवाहाने नदीकाठच्या वस्त्या, बाजारपेठा, रस्ते आणि पूल अक्षरशः वाहून गेले. अनेक भागांचा संपर्क तुटल्याने बचावकार्यही आव्हानात्मक बनले आहे
स्याफ्रुबेसी, तिमुरे, बेत्रावती, मैलुंग आणि शांती बाजार परिसराला पुराचा मोठा फटका बसला. अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून काही इमारती आणि दुकाने उद्ध्वस्त झाली आहेत. रसुवागढीकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग अनेक ठिकाणी वाहून गेल्याने चीन सीमेकडील दळणवळण प्रभावित झाले आहे.
पूर ओसरल्यानंतर लष्कर, पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाने शोध व बचावमोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत किमान सात ते आठ मृतदेह आढळल्याची माहिती असून अनेक जण बेपत्ता आहेत. काही सुरक्षा कर्मचाऱ्यांशीही संपर्क होऊ शकलेला नाही.
नेपाळी लष्कराने तिमुरे, स्याफ्रु आणि नुवाकोट परिसरातून किमान २५ जणांची सुटका केली असून मदत व बचावासाठी १४ हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत.
दरम्यान, तिबेटच्या भागात बर्फाचा दरड कोसळून नदीचा प्रवाह अडला असावा आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी अचानक खाली आल्याने हा महापूर आला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुसळधार पावसाचाही या संकटाला हातभार लागल्याचे सांगण्यात येत आहे.
भोटेकोशीचे पाणी पुढे त्रिशूली नदीत मिसळत असल्याने नुवाकोट, धादिंगसह नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीकाठापासून दूर राहून सुरक्षित व उंच ठिकाणी आश्रय घ्यावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. वीज, दळणवळण आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने नुकसानग्रस्त भागात मदत पोहोचविणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!