Edition

गतवर्षीच्या तुटलेल्या ऊसाला हंगामातील प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता तातडीने द्या य.यो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याना यांना निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी.. वाढलेल्या साखरेतील भावातील हिस्सा शेतकऱ्यांना द्या..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

इस्लामपूर / प्रतिनिधी :
पश्चिम महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यांनी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदा खरीप हंगाम अर्ध्यावर आला असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अडसाली ऊस लागवड, मशागत, रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी तसेच ट्रॅक्टर भाड्यात झालेल्या मोठ्या दरवाढीमुळे आर्थिक ताण वाढला आहे. रासायनिक खतांच्या गोणीचे दर सुमारे २,५०० ते २,७०० रुपयेपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून, त्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे.
दुसरीकडे, राज्यातील साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती यंदा समाधानकारक असल्याचा दावा त्यांनी केला. साखरेचा विक्री दर प्रति क्विंटल ५००० ते ५३००रुपये पेक्षा अधिक असून, किरकोळ बाजारात साखर ६५ रुपये प्रति किलोपेक्षा जास्त दराने विकली जात आहे. तसेच बी-हेवी मोलॅसिसचा दर ६७ रुपये प्रति लिटर, हेवी मोलॅसिस ५५ रूपये प्रति लिटर आणि कच्च्या अल्कोहोलचा दर ६३ रुपये प्रति लिटर असल्यामुळे साखर कारखान्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी आपल्या आर्थिक क्षमतेचा विचार करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रति टन ३००रुपये दुसरा हप्ता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा, मागणी विचार न केल्यास साखर कारखान्यातील साखर बाहेर पडू देणार नाही व साखर रोखू असाही इशारा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.यावेळी स्वाभिमानी संघटनेचे नेते, भागवत जाधव, जिल्हाध्यक्ष देवानद पाटील, बापूसो साळुंखे,शिवाजी पाटील जेष्ठ नेते शंकरांआण्णा पाटील प्रकाश देसाई तानाजीराव साठे प्रदिप पाटील,उत्तम पाटील, प्रभाकर पाटील, दत्तात्रय जाधव,रामभाऊ साळुखे,दत्ताजी पाटील,आकाश साळुखे, रामचंद्र जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते
यांनी केली आहे.

चौकट :यदा चालू हंगामात शेतकऱ्याने ऊसतोड गडबड न करता जरा थांबा उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळवून देऊ
यावर्षी पावसाचे पर्जन्यमान अत्यंत कमी आहे. त्यामुळे उसाची वाढ झालेली नाही. कर्नाटक राज्यातील साखर कारखाने लवकर चालू होणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रात साखर कारखान्यांना उसाचा तुटवडा भासणार आहे. शेतकऱ्यांनी थोडी कळ सोसावी आंदोलनाला पाठबळ द्यावी तुम्हाला यंदा तुमच्या ऊसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळवून देऊ
भागवत जाधव
नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!