Edition

हॉटेल व्यवस्थापकाच्या खूनप्रकरणी दोघांना २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

इचलकरंजी / प्रतिनिधी : यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहतीतील हॉटेल अॅकॉर्डच्या व्यवस्थापकाच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अल्बर्ट एम्ब्रोस (वय ५३, रा. मिरज) यांचा दगडाने ठेचून व काठीने मारहाण करून खून केल्याचा आरोप दोघांवर आहे.
या प्रकरणी शहापूर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार गंगा प्रविण पाटील (वय २१, रा. यड्राव) आणि अशपाक सिकंदर नदाफ (रा. खोतवाडी) यांना अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली.
शनिवारी रात्री गंगा पाटील व अशपाक नदाफ हे मद्यपानासाठी हॉटेल अॅकॉर्डमध्ये आले होते. यावेळी एका महिलेशी त्यांचा वाद झाला. हा वाद सोडवून त्यांना समजावण्यासाठी व्यवस्थापक अल्बर्ट एम्ब्रोस गेले असता संशयितांनी त्यांच्यावर दगडाने हल्ला केला. तसेच काठीने बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर शहापूर पोलीस व कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. जयसिंगपूर ते अंकली टोल नाका दरम्यान दोन्ही संशयितांचा माग काढून त्यांना जेरबंद करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास शहापूर पोलीस करीत आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!