Edition

रिपब्लिकन सेनेची कोल्हापूर सर्किट हाऊस येथे संवाद बैठक संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर/प्रतिनिधी: उदय साळुंखे,
दि.२४-८-२०२६
कोल्हापूर येथील सर्किट हाऊस येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने, युवा नेते ॲड. अमन आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. डॉ. सुशील कुमार सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. रमेश उबाळे साहेब यांच्या सूचनेनुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष मा. दयानंद शिवजातक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संवाद बैठकीत संघटनात्मक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासह कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये तसेच या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये रिपब्लिकन सेनेची भूमिका अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीदरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी लोकसभा अध्यक्ष बदलण्याची मागणी एकमुखीपणे केली. कोल्हापूर लोकसभा अध्यक्षपदी मा. सागर कुरडे साहेब यांची निवड करण्यात यावी, अशी मागणी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. तसेच हातकणंगले लोकसभा अध्यक्षपदी मा. प्रदीपसिंह माने साहेब यांची निवड करण्यात यावी, अशीही एकमुखी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर हातकणंगले लोकसभा महिला आघाडी अध्यक्षपदी सौ. अनिता नलवडे मॅडम यांची निवड करण्यात यावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली.
कोल्हापूर लोकसभा व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील रिपब्लिकन सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांची ही मागणी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर साहेब, युवा नेते ॲड. अमन आंबेडकर साहेब, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. डॉ. सुशील कुमार सूर्यवंशी साहेब आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. रमेश उबाळे साहेब यांच्याकडे मांडण्यात यावी.
“सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा,” अशी विनंती सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष मा. दयानंद शिवजातक साहेब यांच्याकडे करण्यात आली. कार्यकर्त्यांची भावना व संघटनात्मक गरज लक्षात घेऊन वरिष्ठांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. रिपब्लिकन सेनेच्या विचारधारेचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी आगामी काळात व्यापक संघटनात्मक कार्यक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
बैठकीस रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष मा. दयानंद शिवजातक साहेब, यांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन सेना युवा आघाडीमध्ये कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.

त्यावेळी उपस्थित
भीमराव गोंधळी, करवीर तालुका अध्यक्ष,अमोल कांबळे युवा जिल्हा अध्यक्ष, सुमित कांबळे, विनोद कांबळे रसिका चोगुले अर्जुन कांबळे, अर्जुन गोंधळी ‌सारंग कांबळे, संजना कुराडे,सुमन कांबळे,पुजा, कांबळे, रिया शेख,पायल कुरडे सारिका भलाळ शिवाजी कांबळे, प्रवीण आजवेकर, संतोष कांबळे, साहिल कांबळे, अजित कांबळे,किरण कांबळे पिंटू कांबळे, अक्षय पठाण, प्रभाकर कांबळे,रवी चोगुले,रवी कांबळे, पंडित कांबळे, संदिप गोंधळी, विजय कांबळे, राजू जाधव, शंकर कांबळे, विवेक रजपूत दीपक डोणे, अमोल कांबळे पदाधिकारी, प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!