Edition

विद्यार्थी व पालकांनी जगण्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे : आमदार सतेज पाटील

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर (प्रतिनिधी) :
राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्था यांच्यावतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, आज स्पर्धेच्या व धकाधकीच्या काळात विद्यार्थ्यांचे बालपण हिरावले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा काळात स्वतःचे करिअर करीत असताना जगण्याबद्दलचा एक नवा सकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थी आणि पालकांनी अवलंबावा. नकारार्थी फेक निगेटिव्ह तयार होण्याच्या काळामध्ये सकारात्मक दृष्टिकोनच, विद्यार्थी आणि पालकासह समाजाचे जगणे सुंदर करू शकतात. स्वतःचे करिअर करत असताना व्यवसायिक शिक्षण घेऊन स्वतः समृद्ध बनणे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे. मोठी स्वप्न बघणं आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट करणे, सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे विद्यार्थी व पालकांना गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी प्रमुख व्याख्याते अनिल म्हमाने मार्गदर्शन करताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा? विचार कसा करावा? यासाठी घरातील वातावरण कसे असावे? पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी संवादी कसे बनावे? स्पर्धेच्या युगामध्ये लहान मुलांचे बालपण आणि माणूसपण उध्वस्त होणार नाही याची काळजी कशी घ्यावी? जास्त गुण मिळवण्याच्या इर्षेतून विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत आहेत. त्यांना व्यवहारिक शिक्षण देण्याची गरज आहे.
संदीप जंगम (हेड -एच.आर अँड ॲडमिन सिनर्जी ग्रीन इंड. लि.) यांनी आपल्या मनोगतात विध्यार्थी आणि त्याची जडण घडण यात पालकांची मोठी जबाबदारी आहे. गुणवंत विध्यार्थी म्हणून आपले करिअर शोधताना नव्या वाटा शोधणे आवश्यक आहे. पारंपरिक शिक्षणासोबत आपले नवनवीन कौशल्य विकसित करणे आणि आधुनिक जगात सक्षम होणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त केले.
सतीश मुसळे (बालाजी प्रॉपर्टीज), घनश्याम चक्के (नगरसेवक- वाई नगरपरिषद) अतुल बांदिवडेकर (टॅक्स सल्लागार), सचिन खराडे (केंद्र संचालक – म.का.क. मंडळ) आदींनी मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
हर्षदा सोले, स्वराज थोरात, पोर्णिमा चौगुले, स्वराली शिंदे, प्रणव पोवार, श्रुती सुर्यवंशी, स्वरा मोरे, साद नदाफ, अथर्व डवरी, प्रणव गावडे, प्रणोती मोरे, अन्नपूर्णा खोत, श्रावणी जानकर, आसावरी पांडव, आर्या घोरपडे, सृष्टी आपके, अंकिता गायकवाड, प्रतिक्षा देसाई, रेवती गंगापुरे, अवनी कुलकर्णी, मनस्वी जाधव, प्रणव सुतार, आयोध्या मिसाळ, अनुष्का शेवरे, विराज निकम, स्नेहल पाटील, ज्ञानेश्वरी शिंदे, वैष्णवी शिंदे, सिद्धी माळी, प्रेमजीत वाडकर, दिव्या सासने, आर्यन खोत, तहजीब मुलाणी, वरूण कांबळे, मानसी लोंढे, तन्वी भिसे, रुचिका तांबे, दिया पुजारी, जिजाऊ मुळीक, आदर्शा घोरपडे, अक्षरा माने, गायत्री मगदूम, श्रद्धा पोवार, समिक्षा केंगारे, साईराज गुरव, कार्तिकी भारती, अंकिता भानसे, आदिती नरूटे आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुस्तकरूपी ग्रंथ देऊन मान्यवर पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी दोन्ही संस्थेच्यावतीने जिल्हा, राज्य व देश पातळीवर सातत्याने सुरू असलेल्या समाजाभिमुख कार्याचा आढावा सांगून स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे निवेदन संघसेन जगतकर यांनी केले तर आभार अनिता काळे यांनी मानले.
यावेळी महादेव चक्के, संजय सासने, संभाजी थोरात, भगवान माने, सुभाष पाटील, दिनकर आडसूळ, रघुनाथ मुधाळे, संजय गुरव, शिवाजी चौगुले, विजय आरेकर आदी. पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!