Edition

मुलाला शाळेत बसून परतताना महिलेचा टाटा मॅजिकच्या धडकेत मृत्यू.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

तारदाळ : मुलाला शाळेच्या बसमध्ये बसवून घरी परतत असताना भरधाव टाटा मॅजिक वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत पद्मीनी प्रफुल्ल कांबळे (वय ३२, रा. बाळासाहेब ठाकरेनगर, गल्ली नं. १२, तारदाळ) यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (२० ऑगस्ट) सकाळी साडेआठच्या सुमारास हातकणंगले-तारदाळ मार्गावर बाळासाहेब ठाकरेनगर बोर्डाजवळ घडली.
याबाबत पद्मीनी कांबळे यांचे पती प्रफुल्ल अर्जुन कांबळे (वय ३७, व्यवसाय जनरल स्टोअर, रा. बाळासाहेब ठाकरेनगर, गल्ली नं. १२, तारदाळ) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मीनी कांबळे या सकाळी त्यांचा मुलगा प्रज्वल याला शाळेच्या बसमध्ये बसवण्यासाठी गेल्या होत्या. मुलाला बसमध्ये बसवून त्या घरी परतत असताना हातकणंगलेहून तारदाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाटा मॅजिक (एमएच ०९ डीएम ४१५५) वाहनाने त्यांना समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी टाटा मॅजिक चालक अनिल बंडा धनगर (वय ३१, व्यवसाय ड्रायव्हर, रा. चांदनी चौक, चोपडे गल्ली, तारदाळ) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही महिला सहायक फौजदार गायकवाड यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कोष्टी करीत आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!