Edition

विश्रांतवाडी येथे आरपीआय ख्रिश्चन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी – विश्रांतवाडी पुणे येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट) ख्रिश्चन आघाडी नाम फलकाचे उद्घाटन आरपीआय प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आरपीआय ख्रिश्चन आघाडी पुणे शहर अध्यक्ष क्रिस्तोफर राजमनी यांनी केले होते.यावेळी प्रमुख पाहुणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, आर पी आय ख्रिश्चन आघाडी विश्रांतवाडी अध्यक्ष सिरील मारियन, पुणे शहर महिला अध्यक्षा डार्थी थॉमस, उपाध्यक्ष विश्रांतवाडी ख्रिश्चन आघाडी जास्मिन मार्क दत्ता, सचिव विश्रांतवाडी ख्रिश्चन आघाडी मार्क दत्ता, सह सचिव विश्रांतवाडी ख्रिश्चन आघाडी ऑगस्टीइन मेरी व्हिक्टर, सदस्य अजिंक्य राठोड, सदस्य कॅरिडेड रोड्रिक्स, सदस्य व्हिक्टर आर ऑगटीन, सदस्य ॲलेक्स जोसेफ,ओहोल, सदस्य मेरी व्हिक्टर मोझेस आदी उपस्थित होते. यावेळी ख्रिश्चन आघाडी पुणे शहर अध्यक्ष क्रिस्तोफर राजमनी यांनी सांगितले पुणे शहरामध्ये आरपीआयची पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही विविध ठिकाणी नाम फलकांचे उद्घाटन करत आहोत आणि सभासद नोंदणी करून जास्तीत जास्त कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना जोडत आहोत जेणे करून पक्ष संघटना मजबूत व्हावी आणि नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये प्रयत्नशील राहील.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!