Edition

नामघोषात रंगली संत मंडळी; भक्तीभावाने दुमदुमला रवळनाथ मंदिर परिसर.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संजय आगाशे, चंदगड प्रतिनिधी

चंदगड : श्री देव रवळनाथ मंदिर येथे दरवर्षीच्या परंपरेनुसार पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त भक्तिमय भजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संत मंडळी, वारकरी, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ तसेच शहरातील भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते.

संत मंडळींच्या सुमधुर भजनांनी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. अभंग, नामस्मरण आणि टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करण्यात आला. भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मंदिर परिसरात आध्यात्मिक आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले.

या भजन सोहळ्यास चंदगडचे नगराध्यक्ष मा. श्री. सुनीलदादा सुभाष काणेकर, बाबूराव हळदणकर, नारायण चंदगडकर, अमरिश फडणीस, रवळनाथ यादव यांच्यासह चंदगड परिसरातील वारकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या भजन सोहळ्यात संत मंडळींनी विविध अभंग व भक्तिगीते सादर केली. टाळ-मृदंगाच्या तालावर भाविकांनीही भक्तिभावाने सहभाग घेत विठ्ठल नामाचा गजर केला. त्यामुळे संपूर्ण परिसर ‘विठ्ठल विठ्ठल’च्या नामघोषाने दुमदुमून गेला.

भक्ती, अध्यात्म आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला. नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत श्रावण सोमवारची भक्तिमय अनुभूती घेतली.

“नामघोषात रंगली संत मंडळी, भक्तीभावाने दुमदुमली पंढरीची वाट…” या भक्तिमय वातावरणात पहिला श्रावण सोमवारचा भजन सोहळा उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

traffic tail

error: Content is protected !!