
प्रतिनिधी/उदय साळुंखे, आज रात्री आकाशात एक अत्यंत विलोभनीय खगोलीय दृश्य पाहायला मिळत आहे. चंद्राची सोनेरी कोर आणि तिच्या शेजारी अत्यंत तेजस्वी असा शुक्र ग्रह एकत्र आल्याचे दिसत आहेत. सूर्यास्तानंतर पश्चिमेकडील आकाशात हे सुंदर दृश्य उघड्या डोळ्यांनी स्पष्टपणे दिसून येत असून, हा नजराणा खगोलप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे.











