Edition

सदलगा नाड कचेरी येथे उप-तहसीलदार श्री. प्रभाकर शेलवंत यांच्या हस्ते ध्वजारोहण.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सदलगा, ता. चिक्कोडी: ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सदलगा गावच्या नाड कचेरीच्या आवारात ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संगोळ्ळी रायण्णा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून *उप-तहसीलदार श्री. प्रभाकर शेलवंत* यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी त्यांनी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली आणि उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

आपल्या मार्गदर्शक भाषणात शेलवंत यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व, देशाच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य तसेच प्रशासन आणि नागरिकांमधील समन्वयाचे महत्त्व सांगितले. देशाची एकता, अखंडता आणि प्रगती जपण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

*या कार्यक्रमाला उपस्थित होते:*
वर्तुळ अधिकारी मारुती नागराळे, सदलगा गावचे तलाठी नीलकंठ खाडे, अनिलकुमार डेक्कनवर सर, नाड कचेरीचे कर्मचारी शंकर हेग्गण्णावर, खिलारे बंधू, मल्लन्नावर, रमेश काडापुरे, अकबर सनदी, सलीम सनदी, अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच सदलगा गावचे मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिल्यानंतर उपस्थितांनी देशाची एकता, अखंडता आणि प्रगतीसाठी नेहमी कार्य करण्याचा संकल्प केला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.

*वृत्त:* अनिलकुमार डेक्कनवर
*विशालक्रांती न्यूज, सदलगा*

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!