Edition

खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी मध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला.
कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्याचे स्वागत व प्रास्ताविकेने झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
यानंतर दीपप्रज्वलन व प्रतिमा पुजन सरपंच, उपसरपंच सर्व ग्रा.प.सदस्य व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर खोतवाडी गावचे सरपंच मा.श्री.विशाल कुंभार यांच्या हस्ते ध्वजपुजा संपन्न झाली.व गावचे उपसरपंच श्री. राहुल कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
त्यानंतर वंदेमातरम,राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत गाण्यात आले.नंतर एन.सी.सी.कँडेट नी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.व सर्व विद्यार्थी – विद्यार्थीनीनी खडे कवायात प्रकार सादर केले.
तसेच या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित गावचे सरपंच मा.श्री विशाल कुंभार, उपसरपंच मा.श्री.राहुल कांबळे ,सौ.शिल्पा पोवार , मा. श्री.गजानन नलगे,माजी ग्रामपंचायत सरपंच श्री.संजय चोपडे,श्री. बजरंग चोपडे,श्री.रोहण माने,श्री. पुंडलिक शिंदे,श्री. चोपडे बापु, ,श्री.सावंता माने,श्री.वैभव पोवार,श्री.अनिल, माने, सतिश जुगुळकर,किरण कोठावळे,शुभम कांबळे,कुमार पोवार,रविंद्र सासणे,प्रभाकर शिंदे,विजय माने,गणेश सुतार,
अर्जुन रजपुत,सौ.शिल्पा पोवार,मंगल मुसळे,सौ.माधुरी सुतार,सौ.देवकी शिंदे
विद्यालयाचे माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी,गावचे पालक व विद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थीनी, शिक्षक -शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.समाजे सी.बी., श्री.हेमगिरे एस.के.यांनी केले.तर आभार सौ.घुबडे एस.आर.यांनी मानले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!