Edition

सहा महिन्यांत श्री भावेश्वरी पतसंस्थेच्या पाटणे फाटा शाखेने गाठला १ कोटी १० लाखांच्या ठेवींचा टप्पा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संजय आगाशे, चंदगड प्रतिनिधी

आजच्या धावपळीच्या युगात बँकिंग क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतही चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रुक येथील श्री भावेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पाटणे फाटा शाखेने अल्पावधीतच सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. शाखेने अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत १ कोटी १० लाख रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे.

ठेवीदार, कर्जदार व सभासदांनी दाखविलेला विश्वास आणि दिलेले सहकार्य यामुळे पतसंस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी आर्थिक पाठबळ देणारी आणि त्यांच्या अडचणीच्या काळात आधारवड ठरणारी ही पतसंस्था नवउद्योजकांसाठीही आशेचा किरण बनली आहे.

पाटणे फाटा तसेच परिसरातील नागरिकांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन पतसंस्था विविध प्रकारच्या आर्थिक सेवा उपलब्ध करून देत आहे. स्थानिक पातळीवरील बचत, कर्जव्यवहार आणि आर्थिक व्यवहारांना चालना देत परिसरातील अर्थकारणाला गती व बळकटी देण्याचे काम श्री भावेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था करीत आहे.

चंदगड तालुक्याच्या सहकार क्षेत्रात अवघ्या सहा महिन्यांत १ कोटी १० लाख रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण करणे ही निश्चितच उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे. खातेदार, ठेवीदार व सभासदांच्या विश्वासास पात्र ठरत संस्थेने ही प्रगती साध्य केली आहे.

या यशाबद्दल पतसंस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ,सल्लागार, जनरल मॅनेजर,शाखाधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच सर्व सभासद,ठेवीदार व खातेदारांचे अभिनंदन होत असून,भविष्यातही संस्थेची प्रगती अशीच सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!