
ईश्वरपूर प्रतिनिधी – येडेनिपाणी येथील थोर क्रांतिवीर पांडू मास्तर यांच्या स्मारकस्थळी ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. वाढते प्रदूषण आणि तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमास वाळवा तालुक्याच्या मोजणी अधिकारी सुजाता माळी, तालुका कृषी अधिकारी इंद्रजीत चव्हाण, कामेरी सर्कलच्या रुकसाना तांबोळी, मिरज शाखा अभियंता कु. तेजस्विनी गुरव, मोजणी कार्यालय ईश्वरपूरच्या सोनल आवटी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या सरपंच श्यामबाला माळी यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच किरण पाटील, स्थानिक नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला. आनंदराव पाटील, संपतराव चौगुले, रामराव शेवाळे, सिताराम पाटील, अशोक पाटील, अर्जुन पाटील, मकरंद पाटील, माणिक पाटील, प्रशांत पाटील, शरद पवार (अहिरवाडी), एम.एम. पाटील, संपत थोरात, अशोक बापू फौजी, अक्षय पाटील, तलाठी विजय पाटील, कृषी अधिकारी स्वप्निल पाटील, मोहनराव जाधव, बाबासाहेब मदने, जगदीश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील आदी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी उपस्थितांनी सामूहिकपणे विविध वृक्ष व रोपांची लागवड केली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवडीसोबतच वृक्षसंवर्धन करणे आवश्यक असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
स्मारक परिसराची स्वच्छता, निगा आणि लागवड केलेल्या वृक्षांची नियमित देखभाल करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. भविष्यातही पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार अर्जुन पाटील यांनी मानले.











