Edition

डोंगर दर्या खोऱ्यातील जंगलातील दुर्गम भागातील विद्यार्थी आजही शिक्षणापासून वंचित… प्रवीण काकडे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा म्हटले जाते परंतु आजही डोंगर दर्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पासून दूर रहावे लागते असे प्रतिपादन अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड चे संस्थापक अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले.. ते जावली तालुक्यातील कुसुंबी कोकरे वाडी गोरेवाडी शिंदेवाडी ३३ आखाडेवाडी. म्हातेमुरा ४६ व सह्याद्री नगर येथील २६ विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप सॅनिटरी पॅड व वह्या वाटप प्रसंगी बोलत होते.. आजही डोंगर दर्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना पाच सहा किलोमीटर अंतरावर पायी चालत जाऊन शाळेत जावे लागते वन्य प्राण्यांचे हल्ल्यामुळे जीव मुठीत धरून जावे लागते अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात वारा मोठ्या प्रमाणात पाऊस यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ चे वतीने १०५ विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले.आजही महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे जिल्ह्यातील डोंगर दर्या खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात येता येत नाही त्यासाठी अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड हे गेल्या पंचवीस वर्षांपासून विद्यार्थ्यांना सहकार्य करत आहेत ऑगस्ट क्रांती दिनापासून सातही जिल्ह्यांतील दुर्गम भागात साहित्य वाटप सुरू करण्यात येणार आहे. हा उपक्रम वर्षभर सुरू रहाणार आहे यामध्ये २५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मुलींना सॅनिटरी पॅड वाटप करण्यात येणार आहे. आजही दुर्गम भागातील वैद्यकीय सेवा.काही ठिकाणी तरी स्मशानभुमी नाहीत हे दुर्दैव ची बाब आहे याप्रसंगी कु प्रिया शिंदे शंकर ढेबे माजी सरपंच शिवाजी गोरे वेदिका ढेबे मच्छिंद्र कोकरे अर्जुन चव्हाण व विद्यार्थी उपस्थित होते

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!