Edition

चिखल तुडवत, जीव मुठीत धरत ‘स्कूल चले’; धुमाळवाडीतील विद्यार्थ्यांची पावसाळ्यातील परवड…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा प्रतिनिधी – वाळवा तालुक्यातील धुमाळवाडी येथे पावसाळा सुरू होताच विद्यार्थ्यांच्या शाळेचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. चिखल, खड्डे आणि साचलेल्या पाण्यातून वाट काढत लहान-लहान विद्यार्थ्यांना रोज शाळेत जावे लागत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
धुमाळवाडीतील मुख्य यादव-जाधव रस्त्याचे सुमारे १५ वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर आवश्यक दुरुस्ती न झाल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व पाणी साचले असून, अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने पायी चालणेही धोकादायक बनले आहे.
दुसरा कोणताही पर्यायी मार्ग नसल्याने शाळकरी मुले भरपावसात भिजत, चिखल तुडवत आणि जीव मुठीत धरत शाळेत जात आहेत. अनेकदा विद्यार्थ्यांचा तोल जाऊन ते पडतात, त्यांच्या दप्तरातील पुस्तके व वह्या भिजतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच शिक्षणावरही विपरीत परिणाम होत आहे.
गावकऱ्यांनी आणि पालकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत तसेच संबंधित प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात विद्यार्थ्यांची अशीच परवड होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
धुमाळवाडीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व पालकांकडून करण्यात येत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!