हातकणंगले – शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमाची सुरवात प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलनाने झाली.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा व पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले.
यानंतर विद्यालयातील विद्यार्थीनी कु.प्रज्ञा बाळासो बागडे ,इयत्ता 10 वी हिने लोकमान्य टिळक यांच्या जीवनचरित्रा विषयी माहिती सांगितली.तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती आपल्या मनोगतातून सांगितली.
यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्या विषयी माहिती मनोगतातुन सांगितली.
तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सागर चुडाप्पा सर यांनी लोकमान्य टिळक यांच्या सामाजिक कार्याची माहिती मनेगतातुन सांगितली.
तसेच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी सर्व विद्यार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.सी.बी.समाजे यांनी केले तर आभार श्री.एस.एम.कांबळे यांनी मानले.











