Edition

सदलगा शहरातील हेस्कॉम कार्यालयातील क्लासवन मेकॅनिक सागर गिडगल्ले यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात संपन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सदलगा प्रतिनिधी – चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या हुबळी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी म्हणजेच हेस्कॉम या कार्यालयातील क्लास वन मेकॅनिक श्री सागर गिडगल्ले व सौ. शोभा गडगिल्ले या उभयतांचा सेवानिवृत्तीपर सत्कार कार्यक्रम कनकदास भवन येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सागर गडकिल्ले यांनी हुबळी इलेक्ट्रिकल सप्लाय कंपनीमध्ये अविरतपणे 25 वर्षे सेवा पूर्ण करून आज सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा कार्यालयातील अधिकारी बसवराज पुजारी, मल्लिकार्जुन मडिवाळ, गजानन मडलगी,लक्ष्मण संभाजी, नेमिनाथ नेमाननावर,संतान पेरेरा, नरसप्पा घोसरवाडे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी सागर गिडगल्ले यांच्या कार्य गौरवा विषयी भाषणे केली. आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी सदलगा हेसकॉम डिपार्टमेंटचे कर्मचारी चंदू मठपती, गजानन कोल्हापुरे,सतीश खानापूरे, शिवू भागाई,संजय शिरगावे. यांच्यासह सर्व हेस्कॉम कर्मचारी, शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, डॉक्टर प्रवीण गडकिल्ले, माणिक चंदगडे, बाळासाहेब बदनिकाई, आनंत गिडगल्ले, श्रीमती अलका गिडगल्ले,सौ कुमारी गिडगल्ले, कुमारी प्रणिता गिडगल्ले, कुमारी सविता,आरती गिडगल्ले, नागरिक बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांना कार्यक्रमानंतर प्रीती भोजन देण्यात आले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!