Edition

महिलांच्या स्वावलंबनासाठी गारमेंट शिवणकला प्रशिक्षण शिबिराला तारदाळ येथे उत्स्फूर्त सुरुवात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

तारदाळ प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह, इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी, ग्रामपंचायत तारदाळ आणि उपाध्ये सुईंग मशीन कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या गारमेंट शिवणकला प्रशिक्षण शिबिराची आज उत्साहात सुरुवात झाली. या प्रशिक्षणासाठी परिसरातील सुमारे ७० महिलांनी नोंदणी करून सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्हच्या अध्यक्षा रोटेरियन शीतल उपाध्ये यांनी प्रास्ताविकातून प्रशिक्षण शिबिरामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटेरियन डॉ. प्रशांत कांबळे होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. प्रशांत कांबळे यांनी महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या काळानुसार महिलांनी आपल्या व्यवसायामध्ये नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. नवीन कौशल्यांच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन कुटुंबालाही सक्षम करू शकतात. स्वावलंबी जीवन जगण्यासाठी मिळणारे असे व्यावसायिक प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुका पंचायत समिती सदस्या सौ. प्रियंका खोबरे यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. सरपंच सौ. पल्लवी पवार आणि उपसरपंच सौ. राणी माने यांनी प्रशिक्षणार्थी महिलांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. मुग्धा शहा यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रशिक्षणासाठी सुमारे ७० महिलांनी नोंदणी केली असून, महिलांमध्ये या उपक्रमाबद्दल मोठा उत्साह दिसून आला.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्यांसह इतर मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रशिक्षण शिबिराचे प्रोजेक्ट चेअरमन रोटेरियन सुनील मांगलेकर असून, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्हच्या अध्यक्षा रो. शीतल उपाध्ये, सचिव रो. सतीश मेटे आणि खजिनदार रो. प्रकाश मोरबाळे यांनी उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!