Edition

हुपरी-कोल्हापूर राज्य मार्गावरील उचगांव, गडमुडशिंगी परिसरातील रस्त्यावरील खड्डे तातडीने मुजवावेत – करवीर तालुका शिवसेना (UBT )

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर/प्रतिनिधी उदय साळुंखे,

हुपरी-कोल्हापूर हा राज्य मार्ग असून येथुन हुपरी, पट्टणकोडोली, मुडशिंगी सह फाईव्ह स्टार एम.आय.डी.सी. सह कर्नाटकात ही मोठी वाहतुक असुन शाळा कॉलेजसाठी जाणारी मुले मुली असो, लहान मुलांची विदयार्थी वाहतुक रिक्षा असो व कामावर जाणारी दुचाकी स्वार कामगार असो याची ही ये-जा मोठ्या प्रमाणात आहे. सध्या पावसामध्ये उचगांव व गडमुडशिंगी परिसर असेल व अन्य मार्गावर मोठ मोठे खड्डे पडल्याने दुचाकी वाहन चालकांची कसरत होत आहे. पाण्यामुळे खड्डा दिसत नसल्याने वाहन चालकांचे अपघात होत आहेत. तसेच खड्‌डा आल्यावर अचानक ब्रेक लागल्यामुळे अपघात होत असून त्यामुळे वादावादीचे ही प्रकार होत आहेत हया मार्गावरील खड्डे तात्काळ मुरूम टाकून मुजवावे व पावसाळ्यानंतर त्याचे डांबरीकरण करावे व दुचाकी वाहनासह चार चाकी वाहनांना आपला प्रवास सुखकर करता यावा अशी करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे. खड्डे तातडीने मुजवावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने मा. उप अभियंतासो, सार्वजनिक बांधकाम उप विभाग, कोल्हापूर यांना देण्यात आले.
यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की उद्यापासूनच यामध्ये मुरूम टाकून खड्डे मुजवून घेऊ व पावसाळ्यानंतर त्याचे डांबरीकरण करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी जिल्हाप्रमुख विराज पाटील, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, फेरीवाला संघटना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नलवडे, प्रकाश मुदुगडे, उपशाखाप्रमुख सुनील पारपानी, अजित चव्हाण, युवा सेना समन्वयक सचिन नागटिळक, विभाग प्रमुख दीपक फ्रेमवाला, गांधीनगर उपप्रमुख दीपक पोपटाणी, विभाग प्रमुख विनोद रोहिडा, प्रसन्न आवटे, अरुण अब्दागिरी आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!