Edition

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार; आरळा-भाष्टेवाडी येथील घटना, वन विभागाकडून तात्काळ पंचनामा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली प्रतिनिधी – शिराळा तालुक्यातील आरळा पैकी भाष्टेवाडी येथे आज, दिनांक २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाष्टेवाडी येथील शेतकरी श्री. तुकाराम चंद्रु भाष्टे हे आपली शेळी स्वतःच्या मालकीच्या रानात चरावयास घेऊन गेले होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेळीवर हल्ला केला. या हल्ल्यात शेळी जागीच ठार झाली.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाशी त्वरित संपर्क साधण्यात आला. माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने सायंकाळी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व घटनेचा रीतसर पंचनामा केला.
यावेळी वनपाल श्री. आप्पासाहेब पांडुरंग नरुटे, वनरक्षक श्री. सुनिल बसप्पा कुरी, वनसेवक श्री. लक्ष्मण रामचंद्र झोळे आणि श्री. वैभव आनंदा गुरव हे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वन विभागाने पंचनामा केला असून बाधित शेतकऱ्याला योग्य ती भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. तसेच परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सायंकाळच्या वेळी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!