Edition

प्रा.खरटमोल, श्री व सौ.डॉ.नलावडे यांच्या संशोधनास आंतरराष्ट्रीय पेटंट सांडपाण्यातील हानिकारक रंगद्रव्य काढण्याचे तंत्र युके सरकारकडून मान्य

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

औंध, प्रतिनिधी : औंध शिक्षण मंडळ संचलित राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय, औंध येथील रसायनशास्त्र विभागात कार्यरत असणारे संशोधक प्रा.राजेश मारुती खरटमोल व त्यांचे पी.एचडीचे मार्गदर्शक स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे लाल बहाद्दूर शास्त्री महाविद्यालय, सातारा येथील प्रभारी प्राचार्य डॉ. अविनाश मारुती नलावडे आणि रसायनशास्त्र विभागातील प्रा.डॉ. सौ. रेखा नलावडे यांच्या संयुक्त संशोधनातून विकसित करण्यात आलेल्या “लॅबोरेटरी डिव्हाइस फॉर सिन्थेसायजिंग मेटल फेराईट ग्राफीटिक कार्बन नायट्राईड नॅनोपार्टीकल’ या अभिनव प्रयोगशाळा उपकरणाला युके सरकारचे पेटंट मंजूर झाले आहे. नॅनोतंत्रज्ञान आणि पर्यावरणीय संशोधन क्षेत्रातील ही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जात असून या यशामुळे औंध शिक्षण मंडळ व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक व संशोधन परंपरेला नवी उंची प्राप्त झाली आहे.

याबाबत बोलताना प्रा.खरटमोल म्हणाले, ‘या उपकरणाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे डाय डिग्रेडेशन क्षेत्रातील त्याचा प्रभावी उपयोग. औद्योगिक सांडपाण्यातील हानिकारक रंगद्रव्यांचे विघटन करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रगत नॅनोमटेरियल्सची निर्मिती या उपकरणाद्वारे अधिक परिणामकारक पद्धतीने करता येते. त्यामुळे पर्यावरण संरक्षण, जलप्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत विकासासाठी हे संशोधन भविष्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल.’

डॉ.अविनाश नलवडे म्हणाले, ‘या संशोधनामध्ये अत्याधुनिक नॅनोपार्टिकल्सच्या निर्मितीसाठी उपयुक्त असे विशेष प्रयोगशाळा उपकरण विकसित करण्यात आले आहे. हे उपकरण मेटल फेराईट आणि ग्राफिटिक कार्बन नायट्राइड नॅनोपार्टिकल्सच्या संश्लेषण प्रक्रियेला अधिक अचूक, कार्यक्षम आणि संशोधनाभिमुख बनवते.’

त्याबद्दल औंध शिक्षण मंडळ औंध संस्थेच्या चेअरमन श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी , व्हा. चेअरमन श्रीमंत चारुशीलाराजे पंतप्रतिनिधी, सर्व विश्वस्त, सचिव श्री. प्रदीप कणसे , सहसचिव प्रा. संजय निकम व दिपक करपे, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. श्रीकांत भंडारे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

याचबरोबर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य श्री. अभयकुमार साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कौस्तुभ गावडे यांनी अभिनंदन केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

traffic tail

error: Content is protected !!