Edition

सेलू–परभणी रस्त्यावरील वृक्षारोपण भविष्यातील रस्ता रुंदीकरण लक्षात घेऊन करावे. – डॉ. संजय रोडगे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : सेलू–परभणी मार्गावरील सिमेंट काँक्रीट रस्त्यालगत सुरू असलेल्या वृक्षारोपण उपक्रमाचे स्वागत केले तसेच, कृषी उत्पन्न बाजार समिती, सेलूचे सभापती डॉ. संजय रोडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला महत्त्वपूर्ण सूचना लेखी स्वरूपात केली आहे.
डॉ. रोडगे यांनी म्हटले आहे की, पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होणे आवश्यक असले तरी भविष्यात या रस्त्याचे चार पदरी किंवा अन्य स्वरूपात रुंदीकरण होण्याची शक्यता लक्षात घेऊन झाडे योग्य अंतरावर व नियोजनपूर्वक लावणे गरजेचे आहे. कमी अंतरावर लावलेली झाडे भविष्यात विकासकामांना अडथळा ठरू शकतात आणि ती तोडावी लागल्यास पर्यावरणासह शासनाच्या निधीचेही नुकसान होईल.
यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तांत्रिक निकषांनुसार व भविष्यातील विकास आराखडा लक्षात घेऊन वृक्षारोपणाचे नियोजन करावे, अशी मागणी डॉ. रोडगे यांनी केली असून यासंदर्भात कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, परभणी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!