गांधीनगर:प्रतिनिधी
उदय साळुंखे
दि. २१ जुलै २०२६ | कोल्हापूर
भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त जाधववाडी येथील महापालिकेच्या प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर या शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते उमेश माने यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच नगरसेविका प्राजक्ता जाधव, गोपाल निरंकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्या, कंपास बॉक्स, पेन, टूथब्रश, टूथपेस्ट, साबण तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी मार्गदर्शन करताना कृष्णराज महाडिक यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा अतिवापर टाळून शिक्षणासोबतच क्रीडा, संस्कार आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला सुनील कटियार, अमित बठेजा, अमर काटकर, अभिषेक जाधव, नितीन डकरे , अभिजीत अवघडे यांच्यासह पालक, शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. उमेश माने यांच्या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा आधार मिळत असल्याची भावना व्यक्त केली.

गांधीनगर:प्रतिनिधी










