Edition

पोटच्या मुलीची २३ हजार रुपयांत विक्री; आई प्रियकरासह पसार अल्पवयीन मुलीचे मंदिरात लग्न लावून देण्याचा धक्कादायक प्रकार; केळवद पोलिसांकडून आठ जणांना अटक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नागपूर : वृत्तसेवा
आईनेच आपल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची प्रियकराच्या मदतीने २३ हजार रुपयांत विक्री करून तिचे लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार केळवद पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने धाडस दाखवत पोलिसांना माहिती दिल्यानंतर केळवद पोलिसांनी तिच्या आईसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केली.
या प्रकरणातील आरोपींमध्ये पीडित मुलीची आई, तिचा प्रियकर, रवी रामप्रसाद यादव, रामप्रसाद यादव, संजय रतन परमार, राजेश गणपत वछांगी, दुल्हेसिंग गजबसिंग कछवाया आणि ‘खाला चाची’ यांचा समावेश आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आठवीपर्यंत शिक्षण झाले असून तिचे वडील मागील दोन वर्षांपासून कुटुंबापासून विभक्त आहेत. सुमारे दोन महिन्यांपासून तिच्या आईचे एका युवकासोबत संबंध असल्याचे तक्रारीत नमूद आहे. शुक्रवारी (दि. १७) आईच्या प्रियकराने तिच्या मोबाइलवर संपर्क साधून आई व मुलीला नयाकुंडा परिसरात बोलाविले. त्यानंतर तिघेही मेयो रुग्णालयासमोर आले. तेथे ‘खाला चाची’ त्यांना भेटली. काही वेळाने इतर संशयित आरोपी कारमधून तेथे आले.
सर्वजण कोराडी मंदिरात गेले. ‘इंदूरहून पार्टी आली आहे. काही दिवस त्यांच्यासोबत इंदूरला जा, आपल्याला पैसे मिळणार आहेत,’ असे सांगून आईने मुलीला लग्नासाठी तयार केले. त्यानंतर मंदिरात तिचे लग्न लावून देण्यात आले. लग्नानंतर आई व तिचा प्रियकर तेथून निघून गेले.
एमपी-११-झेडएन-६७१३ क्रमांकाच्या कारने आरोपी मुलीला घेऊन इंदूरकडे निघाले. कारमधील चर्चेदरम्यान आईने आपली २३ हजार रुपयांत विक्री केल्याचे मुलीला समजले. यावरून तिने आईशी वाद घालत तत्काळ केळवद पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून आठही आरोपींना अटक केली. बालविवाह प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांन्वये पुढील तपास सुरू आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!