Edition

जिल्हा परिषद अध्यक्षांचा कनेरी दौरा: जळीत दवाखान्याची पाहणी, पंचनाम्याचे निर्देश.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर:प्रतिनिधी – कणेरी येथील सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्याला शुक्रवारी (दि. १७) रात्री साडेनऊच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण दवाखाना जळून खाक झाला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून आगीची माहिती घेत नुकसानग्रस्त दवाखान्याचा पंचनामा तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कणेरीसाठी नव्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या मंजुरीसाठी आवश्यक प्रस्ताव सादर करून त्याला प्राधान्याने मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी कणेरीचे सरपंच निशांत पाटील यांनी गावातील पशुपालकांची संख्या लक्षात घेता दवाखाना तातडीने नव्याने उभारण्याची मागणी केली.

कणेरी: येथील आगीत जळालेल्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्याची पाहणी करताना जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत. सोबत सरपंच निशांत पाटील, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ.

आगीमुळे पशुवैद्यकीय सेवा विस्कळीत झाल्या असून, शेतकरी व पशुपालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्वरित पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली. पाहणीवेळी जिल्हा परिषद पदाधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!