Edition

कोल्हापूर विमानतळावरील चरस प्रकरणाचा छडा; एलसीबीची कारवाई, दोघे पोलिसांच्या ताब्यात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर:प्रतिनिधी
उदय साळुंखे

गांधीनगर, दि. १४ जिल्ह्यात अमली पदार्थाच्या अवेध व्यापाराविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीश्री) महत्त्वपूर्ण कारवाई करत चरस विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. उचगाव परिसरात सापळा रचून पोलिसांनी ओंकार अर्जुन मिठारी (वय २७, रा. गणेश कॉलनी, मणेरमळा) बाला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत ७९ ग्रॅम चरस, एक दुचाकी आणि मोबाईल असा एकूण १ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओंकार मिठारी हा कोल्हापूर विमानतळावर एका खासगी कंपनीमार्फत बेल्ट ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. ११ जुलै रोजी विमानतळावरील सुरक्षा तपासणीदरम्यान एका प्रबाशाने भीतीपोटी आपल्या ताब्यातील चरख स्वच्छतागृहात टाकून दिला होता. त्यानंतर ओंकार मिठारीने यो चरस ताब्यात घेऊन विक्रीसाठी बाहेर

आपल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात एनडीपीएस (अमली पदार्थ प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान सम्राटनगर येथील मयूर गणेश माने यालाही संशयित म्हणून वाव्यात भेण्यात आले असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस

निरीक्षक सुशांत चव्हाण, गोकुळ शिरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील, उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच वैभव पाटील, संवीष बरगे, गजानन गुख, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, शिवानंद मठपती, सत्यजीत तानुगडे, विशाल खराडे, सवीश सूर्यवंशी आणि अमित मर्दाने यांच्या पथकाने

हो यशस्वी कारवाई केली. या कारवाईमुळे कोल्हापूरमधील अमली पदार्थाच्या अवैध व्यवहारावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!