Edition

शाळा सोडल्याचा दाखला व शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी अवैध शुल्क आकारणी थांबवा; शिवस्वराज्य युवा फाउंडेशनची मागणी.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

हुपरी प्रतिनिधी – विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate) तसेच इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे देताना काही शाळा व महाविद्यालयांकडून रु. 200, रु. 300, रु. 500 किंवा त्याहून अधिक रक्कम शुल्काच्या नावाखाली आकारली जात असल्याच्या तक्रारी शिवस्वराज्य युवा फाउंडेशनकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज शिवस्वराज्य युवा फाउंडेशनच्या वतीने हुपरी व पंचक्रोशीतील विविध शाळा व महाविद्यालयांना निवेदन देऊन विद्यार्थी व पालकांकडून अशा प्रकारची अनावश्यक व अवैध शुल्क आकारणी तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली.

फाउंडेशनच्या सदस्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड, प्रमाणपत्र, गुणपत्रिकेची प्रत, प्रवेशाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे तसेच इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा अविभाज्य भाग आहेत. अशा प्रमाणपत्रांसाठी शासनाच्या नियमांपेक्षा अधिक रक्कम आकारणे विद्यार्थी व पालकांवर अन्याय करणारे असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर त्याचा अतिरिक्त भार पडतो.

यावेळी सर्व शैक्षणिक संस्थांनी शासनाने निश्चित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, कोणत्याही प्रकारची अवैध किंवा अतिरिक्त शुल्क आकारणी करू नये तसेच विद्यार्थी व पालकांना विनाकारण आर्थिक त्रास देऊ नये, अशी मागणी करण्यात आली. भविष्यात अशा प्रकारच्या तक्रारी आढळल्यास संबंधित शाळेविरुद्ध कायदेशीर भूमिका घेण्यात येईल असे अध्यक्ष सुमित जयकर यांनी सांगितले.

शिवस्वराज्य युवा फाउंडेशनने सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, शाळा सोडल्याचा दाखला किंवा इतर शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी नियमबाह्य शुल्काची मागणी होत असल्यास त्याबाबतची माहिती फाउंडेशनकडे देण्यात द्यावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हक्क अबाधित राहावेत आणि शिक्षण प्रक्रियेत आर्थिक अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी फाउंडेशन सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष सुमित जयकर यांनी स्पष्ट केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!