Edition

चार दिवसांनंतर मलिकवाड–दत्तवाड बंधारा वाहतुकीस खुला; प्रवासी व वाहनधारकांना मोठा दिलासा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशाल क्रांती प्रतिनिधी अमर माने मलिकवाड,

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दूधगंगा नदीवरील कर्नाटक व महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा मलिकवाड–दत्तवाड बंधारा महापुराच्या पाण्याखाली गेला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.

मात्र, गेल्या चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून होणारी पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी दूधगंगा नदीतील महापुराचे पाणी ओसरल्याने मलिकवाड–दत्तवाड बंधारा पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

बंधारा खुला झाल्याने दोन्ही राज्यांतील नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच प्रवासी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसांपासून बंद असलेली वाहतूक पूर्ववत सुरू झाल्याने वाहनधारकांनाही पर्यायी लांबचा मार्ग टाळता येणार असून वेळ व इंधनाची बचत होणार आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक त्या सूचना वेळोवेळी द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!