Edition

कृष्णा नदीच्या पुरामुळे मगरी नदीबाहेर; अमणापूरमध्ये अजस्त्र मगर शेतात विसावली..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली प्रतिनिधी – कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने नदीपात्रातील मगरी आता नदीबाहेर येऊ लागल्या आहेत. पलूस तालुक्यातील अमणापूर येथे नदीकाठच्या शेतात एका अजस्त्र मगरीने मुक्काम ठोकल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. पुराच्या पाण्यामुळे नदीपात्रातील मगरी सुरक्षित जागेच्या शोधात बाहेर पडत असून नदीकाठच्या शेतांमध्ये त्यांचा वावर वाढला आहे.
अमणापूर येथील एका शेतात मोठी मगर शांतपणे विसावलेली दिसून आली. विशेष म्हणजे नदीच्या दिशेने तोंड करून मोठा जबडा उघडून बसलेल्या या मगरीचा थरारक व्हिडिओ शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या घटनेमुळे नदीकाठच्या परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून शेतात काम करताना तसेच नदीकाठी जाताना विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. मगर आढळल्यास तिच्याजवळ जाण्याचा किंवा तिला छेडण्याचा प्रयत्न न करता तत्काळ वन विभागाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!