Edition

2016 पासून फरार असलेला आरोपी रिसोड पोलिसांच्या जाळ्यात; 10 वर्षांनंतर अटक.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्हा प्रतिनिधी : संतोष भालेराव, वाशिम : रिसोड पोलीस स्टेशनच्या पथकाने विशेष कामगिरी करत सन 2016 पासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे. तब्बल दहा वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेपासून दूर राहणाऱ्या आरोपीला शोधून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.
पोलीस स्टेशन रिसोड येथे सन 2008 मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 324, 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी एकनाथ झुबर डोंगरे (वय 40, रा. बोरखेडी, ता. रिसोड, जि. वाशिम) हा सन 2016 पासून फरार होता.
रिसोड पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे 7 जुलै 2026 रोजी आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री निकेश खतमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड मॅडम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक वसंत तहकीक, पोहवा शंकर दामोडे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद जायभाये, हेमंत सरकटे व राजेश गांगवे यांनी केली.
रिसोड पोलिसांच्या या कारवाईमुळे फरार आरोपींविरुद्ध सुरू असलेल्या शोधमोहीमेला आणखी बळ मिळाले असून कायद्यापासून कोणीही सुटू शकत नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!