Edition

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर, वृत्तसेवा – समाजात रुजलेल्या अनिष्ट, अघोरी अमानुष गैरसमजुतीमुळे समाजाचे अतोनात नुकसान होत आहे. लोकांचे होणारे शोषण व छळ थांबवण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा प्रभावीपणे राबविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ . विजय राठोड यांनी आज सूचना केल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरावरील जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबाजवणी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) सुवर्णा पत्की, सदस्य सचिव सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सरिता थोरात ,माहिती अधिकारी फारूक बागवान ,गणेश पाटील , महेंद्र कांबळे ,योगेश पाटील , जेष्ठ नागरिक संघाचे अशासकीय सदस्य रामचंद्र पाटील आदी उपस्थित होते.

            कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या जादूटोणा घटना व तक्रारींबाबत या बैठकीत चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, श्रद्धा आणि अंधश्रद्धांमधील फरकांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करीत जादूटोणा विरोधी कायद्याचा धाक अनिष्ट कृत्य करणाऱ्या लोकांना समजण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.गावात,शहरात अशा घटना घडत असतानाच  पोलीसांनी कडक कारवाई करावी. तसेच गुन्हे नोंदविल्याबाबत व्यापक प्रसिद्धी करावी.तत्पूर्वी श्री साळे यांनी या बैठकी पाठीमागील भूमिका जिल्हाधिकाऱ्यांना विषद केली .

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!