Edition

शेतकरी सुपुत्र प्रमोद भालेराव यांना ‘गौरवशाली व्यावसायिक पुरस्कार’ प्रदान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्हा प्रतिनिधी : संतोष भालेराव
वाशिम : रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द येथील शेतकरी कुटुंबातील युवा उद्योजक प्रमोद उत्तमराव भालेराव यांना मैत्रेय त्रिरत्न बहुउद्देशीय संस्था, पुणे यांच्या वतीने सन २०२५–२०२६ या वर्षासाठीचा प्रतिष्ठेचा ‘गौरवशाली व्यावसायिक पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
प्रमोद भालेराव हे दापुरी खुर्दचे माजी सरपंच उत्तमराव भालेराव यांचे सुपुत्र तसेच पत्रकार विनोद भालेराव यांचे लहान बंधू आहेत. सध्या ते पुणे येथे वास्तव्यास असून यू. बी. इंटरप्राईजेस (Environmental Health and Safety Services) या उद्योगाचे यशस्वीपणे संचालन करत आहेत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय स्थान निर्माण केले आहे. पर्यावरण, आरोग्य व सुरक्षा सेवा (Environmental Health and Safety Services) या क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत मैत्रेय त्रिरत्न बहुउद्देशीय संस्थेने त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविले आहे.
व्यवसायातील गुणवत्ता, प्रामाणिकपणा, सातत्य आणि नवोन्मेषी दृष्टिकोन यामुळे त्यांनी अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत यापूर्वीही महाराष्ट्र शासनासह विविध शासकीय व सामाजिक संस्थांकडून त्यांना विविध पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले आहेत.
भविष्यात आपल्या उद्योगाचा विस्तार देशभर करण्याचा त्यांचा संकल्प असून या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल दापुरी खुर्द गावासह सामाजिक,    व्यावसायिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!