Edition

नूतन मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ. शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा ८७ वा वर्धापन दिन, दलितमित्र श्रीरामजी भांगडीया स्मृतिदिन व श्रीरामजी भांगडीया रजत जयंती वर्षानिमित्त संस्थेतील माध्यमिक, उच्च माध्यमिक, चित्रकला, विविध शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी , खेळाडू, शिक्षकांचा सत्कार सोहळा नूतन कन्या प्रशालेच्या कै.सौ. कमलाबाई आसारामजी बाहेती सभागृहात शुक्रवार ( दि.०३ ) रोजी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया हे होते तर. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी विद्यार्थी, बालरोगतज्ञ डॉ. सत्यनारायणाजी सोमाणी ( परभणी ), डॉ. मनीषा घांडगे-डोंबे ( सेलू ) यांची उपस्थिती होती. मंचावर संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी,कार्यकारिणी सदस्य दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, डॉ. विजेंद्र नागोरी, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोर बाहेती ( नूतन कन्या ), सिताराम मंत्री ( नूतन विद्यालय ), प्राचार्य डॉ.उत्तम राठोड, मुख्याध्यापक संतोष पाटील, नरेंद्र पाटील, उल्हास पांडे,निशा पाटील यांची उपस्थिती होती. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या विविध घटक संस्थेतील १०९ गुणवंत विद्यार्थी, खेळाडू आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे गुणवंत पर्यवेक्षक गणेश माळवे, सहशिक्षक डॉ.सुरेश हिवाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांनी केले. संस्थेचा वार्षिक अहवाल वाचन जयप्रकाश बिहाणी यांनी केले. डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पर्यवेक्षक शंकर बोधनापोड, किशोर कटारे, ज्योती कुंभकर्ण, डॉ. भाग्यश्री धामणगावकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन केले. सुत्रसंचलन अतुल पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक निशा पाटील यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक लिंबेकर, बाबासाहेब हेलसकर, शशिकांत देशपांडे, भालचंद्र गांजापूरकर आणि संस्थेतील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.
यशप्राप्तीसाठी आत्मविश्वासाने वाटचाल करा – डॉ. मनिषा घांडगे.
आजच्या काळात सामाजिक माध्यम ही मन विचलित करीत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञान, मोबाईलचे गुलाम न होता. योग्य कारणासाठी सामाजिक माध्यमांचा वापर करावा. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी नियमित व्यायाम, ध्यान धारणा करावी. विद्यार्थ्यांनी यशप्राप्तीसाठी आत्मविश्वासाने वाटचाल करावी. विद्यार्थ्यांच्या रूपाने शिक्षक सुसंस्कृत समाज घडवतात. त्यामुळे पालकांनीही मुलांचा कल ओळखून त्यांना त्यांच्या आवडीचे अभ्यासक्षेत्र निवडू द्यावे. आपल्या इच्छांचे ओझे पालकांनी पाल्यांवर लादू नये. आपल्या मुलांची इतरांशी तुलना करू नये.कौतुक आणि प्रोत्साहनमुळे मुलांचे भविष्य उज्वल होते.
नूतन विद्यार्थी घडविणारे संस्कार केंद्र – डॉ. सत्यनारायण सोमाणी.
नूतनने जीवनातील मुल्य शिकवली. सामाजिक जाणीव वृध्दींगत केली. त्यामुळेच माझ्यासह नूतनचे हजारो विद्यार्थी आपले कर्तृत्व सिद्ध करून आपापल्या क्षेत्रात यशोशिखरावर पोहोचली आहेत. नूतन हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाला आकार देणारे संस्कार केंद्र आहे.विद्यार्थीनी मोठी स्वप्ने पाहावीत. ध्येयवादी व्हावे.शिक्षकांच्या मार्गदर्शनानेच विद्यार्थी घडतात.विद्यार्थ्यांनी अभ्यास, परिश्रमातून मिळालेल्या यशाने आईवडील, स्वतः चे , संस्थेचे नाव मोठे करावे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!